call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
Information

article
ध्येय व उद्दिष्टे

समाजहित, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा दृढ संकल्प.

ध्येय व उद्दिष्टे

नमस्कार,


Manmad Social & Culture Group

नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)


सविस्तर माहिती पत्रक 
(प्रस्तावित आराखडा)


प्रस्तावना


मनमाड शहरातील तसेच विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मनमाडकरांना एकत्र आणणे, सामाजिक एकोपा वाढवणे, सांस्कृतिक वारसा जपणे, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक आणि रोजगारविषयक मदत उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनमाड सोशल & कल्चर क्लब स्थापन करण्यात येत आहे.


ही संस्था समाजहित, परस्पर सहकार्य, नवउद्योजकांना प्रोत्साहन, गरजूंना मदत आणि सांस्कृतिक जतन यासाठी कार्यरत राहील.
संस्थेची प्रस्तावित रचना


ट्रस्टी मंडळ


एकूण संख्या : 21 सदस्य

- संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांसाठी सर्वोच्च मंडळ
- आर्थिक पारदर्शकता, दीर्घकालीन नियोजन, मालमत्ता - व्यवस्थापन व देखरेख


प्रमुख पदे

- अध्यक्ष
- उपाध्यक्ष
- सचिव
- सहसचिव
- खजिनदार
- कायदेशीर सल्लागार
- सदस्य

मॅनेजिंग कमिटी


अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव
एकूण संख्या : 31 सदस्य
- दैनंदिन कारभार, कार्यक्रम नियोजन, सदस्य नोंदणी, प्रशासन, समन्वय
प्रमुख जबाबदाऱ्या
- वार्षिक कार्यक्रम आखणी
- सभांचे आयोजन
- निधी संकलन
- सदस्य विस्तार मोहीम
- समित्यांचे समन्वयन
- सामाजिक उपक्रम राबविणे

विविध समित्या


प्रत्येक समितीत 10 सदस्य समित्यांची यादी व कार्यक्षेत्र


वैद्यकीय समिती


- मोफत तपासणी
- हॉस्पिटल समन्वय
- गरजूंसाठी वैद्यकीय मदत


शिक्षण समिती


- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- प्रवेश व करिअर मार्गदर्शन
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


निवास समिती


- होस्टेल 
* बाहेरून येणाऱ्या
* मनमाडकरांसाठी निवास मदत
* आपत्कालीन निवास सुविधा


डब्बा समिती


- रुग्ण साठी डब्बा सेवा
- आपत्कालीन अन्न मदत


रोजगार समिती


- नोकरी मेळावे
- रोजगार माहिती
- कौशल्य प्रशिक्षण
- मुलाखत मार्गदर्शन
- उद्योग संधी माहिती


व्यापार समिती


- व्यापाऱ्यांचे नेटवर्किंग
- नवीन व्यवसाय मार्गदर्शन
- गुंतवणूक संधी
- व्यापार प्रदर्शन
- उद्योजक मेळावे


महिला समिती


- महिला सक्षमीकरण
- स्वावलंबन प्रशिक्षण
- आरोग्य जनजागृती
- स्वयंरोजगार प्रकल्प


युवा समिती


- नेतृत्व प्रशिक्षण
- स्वयंसेवा अभियान
- सांस्कृतिक कार्यक्रम


सांस्कृतिक समिती


- उत्सव, नाटक, संगीत कार्यक्रम
- मनमाड संस्कृती जतन
- कला स्पर्धा
ज्येष्ठ नागरिक समिती
- आरोग्य व सन्मान कार्यक्रम
- संवाद मेळावे
 


प्रोजेक्ट चेअरमन


एकूण संख्या : 7 सदस्य
प्रत्येक कार्यक्रमासाठी जबाबदारी
वर्षभरात खालील कार्यक्रम घेणार आहोत.
(त्यासाठी एक प्रोजेक्ट चेअरमन असेल)
१) १ जानेवारी नववर्षाचे स्वागत, देवाचे दर्शन
( रामसृष्टी गार्डन, मिसळ पार्टी रविवार असेल तर जेवण)
२) कोजागिरी पौर्णिमा
( सायंकाळी पण, दुस-या दिवशी, जेवण व सांस्कृतिक कार्यक्रम)
३) वनभोजन (सर्वांनी घरुन डब्बे घेऊन यायचे
(याची वेळ ठरवू ठिकाण रामसृष्टी गार्डने)
४) एक गेट टुगेदर
( हॅाल व सांस्कृतिक कार्यक्रम जेवण)
५) एखादी ट्रीप
( अंजनेरी, चामर लेणी, कवनाई व इतर ठिकाण)
६) गणेशोत्सव
( यावर विचार चालु आहे)
७) नवरात्रोत्सव
( यावरही सर्वांचे मत घेऊन ठरवू )

 

हे आहे भविष्यातील संकल्प :


१) मनमाडच्या विद्यार्थ्यांसाठी हॅास्टेल तयार करणे
२) मनमाडहून येणा-या रुग्ण व कुटुंबियांना डब्बा रुग्णालयात  पोहचवणे
३) मनमाडहून येणा-या रुग्णांना मदत व्हावी यासाठी वैद्यकिय समिती तयार करणे
४) मनमाडकरांना रोजगाराची संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणे
५) व्यापार व व्यावसायिकांना मदत कशी होईल यासाठी योजना करणे