newspaper
बातम्या आणि अपडेट्स
संस्थेच्या ताज्या घडामोडी आणि बातम्या.
....सभासद फॅार्म भरण्याचे काम सुरु झाले आहे
नमस्कार,मनमाड सोशल अॅण्ड कल्चरल ग्रुपचे सभासद फॅार्म भरण्याचे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर ओळख पत्र वाटपही करण्यात येत आहे. आज आपण ग्रुपचे अध्यक्ष गौतम हिरण यांच्या हस्ते पहिले कार्ड अविनाश शिरसाट यांचा सभासद फॅार्म भरुन दिले आहे. त्यांना रितसर पावतीही देण्यात आली आहे. सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून मंगळवार पासून व्दारका येथील खरंबदा पार्क येथील पहिल्या मजल्यावर असलेल्या इंडिया दर्पणच्या कार्यालयात व्यवस्था केली आहे. येथे अविनाश शिरसाट हे सकाळी १०.३० ते दुपारी २ पर्यंत उपस्थितीत राहणार आहे. त्यांच्याकडे फॅार्म आहे. येथे आपण ते भरुन देऊन पावती घेणे त्याचबरोबर कार्ड घ्यावे. यात सभासद फी ही १५०० रुपये आहे. पण, ज्यांना ही फी भरणे शक्य नसेल तरी सुध्दा त्यांनी ते भरावे. कारण त्यांना आपण कार्ड देणार आहोत. त्याचा उपयोग वैद्यकिय सेवेसाठी होणार आहे....संपर्कअविनाश शिरसाट9890160315.....पत्ताइंडिया दर्पण ऑफीसखरबंदा पार्क, पहिला मजलाकराड भेळ शेजारी, व्दारकानाशिक- 422011
सह्याद्री हॉस्पिटलसोबत मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपचा सामंजस्य करार
मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्यात सोमवारी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचा मसुदा वैद्यकीय क्षेत्रातील योगेश बागरेचा, नितीन इंदलकर, महेश चव्हाण तसेच इतर सदस्यांना दाखवून त्यांच्या सूचना घेण्यात आल्या.यानंतर ग्रुपचे अध्यक्ष गौतम हिरण आणि सचिव ॲड. हेमंत सोनवणे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर ग्रुपच्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेजवळ आणि गौतम संचेती यांनी हा करार सह्याद्री हॉस्पिटलचे प्रतिनिधी चेतन जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. आता सह्याद्री हॉस्पिटलच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाकडून अंतिम मंजुरी व स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा करार अधिकृतपणे लागू होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. या सामंजस्य करारामुळे मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपच्या सदस्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सेवांवर विशेष सवलती आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. सवलतींचे स्वरूप, अटी व त्याचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया लवकरच ग्रुपवर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
✨ नवी सुरुवात, नवे पाऊल: 'मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप'च्या बँक खात्याचा शुभारंभ!
गेल्या काही दिवसांपासून मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपच्या ट्रस्टची नोंदणी, पॅन कार्ड, बँक खाते उघडणे आदी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे आपल्या काही नियोजित उपक्रमांना तात्पुरती स्थगिती द्यावी लागली. याच काळात ग्रुपच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) कामही सुरू करण्यात आले असून ते अद्याप प्रगतीपथावर आहे. आता बँक खाते सुरू झाल्यामुळे आपल्या संस्थेला देणगी देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. मर्चंट्स बँकेच्या कोणत्याही शाखेत आपण थेट देणगी जमा करू शकता. तसेच, संस्थेच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीनेही रक्कम हस्तांतरित करता येईल. सर्व सदस्य व हितचिंतकांना विनंती आहे की, ज्यांनी देणगी जाहीर केली आहे किंवा ज्यांना देणगी द्यायची आहे, त्यांनी ती संस्थेच्या बँक खात्यावर जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर कृपया त्याची माहिती आम्हाला कळवावी, जेणेकरून संबंधित देणगीची अधिकृत पावती तयार करून देण्यात येईल. आतापर्यंत काही सदस्यांनी धनादेश (चेक) तर काहींनी रोख स्वरूपात देणगी दिली आहे.आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
🏥 आरोग्यसेवेत नवे पर्व — मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप व KIMS मानवता हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करा
“आपुलकीच्या नात्याला आरोग्यसेवेची जोड — प्रत्येक सदस्यासाठी दर्जेदार उपचार, सवलती आणि विश्वासाची साथ!”मनमाडकरांना एकत्र आणत सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप, नाशिक यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.समाजातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार, आधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने KIMS मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्यासोबत दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.हा करार केवळ सवलतींचा करार नसून, आपल्या समूहातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.🌿 “निरोगी समाज — सक्षम समाज”आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यविषयक समस्या कधीही उद्भवू शकतात. अशा वेळी योग्य उपचार, अनुभवी डॉक्टर, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.हीच गरज लक्षात घेऊन मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप आणि KIMS मानवता हॉस्पिटल, नाशिक यांनी परस्पर सहकार्याचा हा उपक्रम सुरू केला आहे.या सामंजस्य कराराच्या माध्यमातून समूहातील सदस्य आणि त्यांच्या आश्रितांना विविध वैद्यकीय सेवा व उपचारांमध्ये विशेष सवलती आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.🏥 KIMS मानवता हॉस्पिटल — आधुनिक आरोग्यसेवेचे विश्वासार्ह केंद्रKIMS मानवता हॉस्पिटल हे नाशिकमधील आधुनिक मल्टी-स्पेशालिटी आरोग्यसेवेचे केंद्र असून विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना सर्वसमावेशक उपचारसेवा उपलब्ध करून देते.हॉस्पिटलमध्ये सुमारे ३५० खाटांची क्षमता, १०० ICU बेड्स, विविध वैद्यकीय विभाग, आधुनिक ऑपरेशन थिएटर्स तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध आहे.हृदयरोग, मेंदू व नसांशी संबंधित आजार, कर्करोग, मूत्रपिंड व मूत्रविकार, पचनसंस्था व यकृताशी संबंधित आजार, हाडे व सांधे, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, फुफ्फुस व श्वसनविकार, मधुमेह व हार्मोनशी संबंधित आजार, डोळ्यांचे विकार, त्वचारोग तसेच विविध आपत्कालीन उपचारांसह अनेक वैद्यकीय क्षेत्रांमध्ये सेवा उपलब्ध आहेत.🎁 MoU अंतर्गत सदस्यांना मिळणारे प्रमुख लाभ🩺 १. पहिल्या OPD भेटीसाठी मोफत डॉक्टरांचा सल्लास्वखर्चाने उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी पहिल्या OPD भेटीतील डॉक्टरांचा सल्ला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.💳 २. पुढील OPD सल्लामसलतीवर २०% सवलतदुसऱ्या OPD भेटीपासून डॉक्टरांच्या सल्लामसलत शुल्कामध्ये २०% सवलत मिळणार आहे.🔬 ३. रेडिओलॉजी तपासण्यांवर २०% सवलतआवश्यकतेनुसार करण्यात येणाऱ्या रेडिओलॉजी तपासण्यांवर हॉस्पिटलच्या नियमानुसार २०% सवलत उपलब्ध होईल.🧪 ४. OPD मधील प्रयोगशाळा तपासण्यांवर २०% सवलतOPD दरम्यान आवश्यक असलेल्या विविध प्रयोगशाळा तपासण्यांवर २०% सवलत मिळणार आहे.💊 ५. औषधांच्या खरेदीवर ५% सवलतहॉस्पिटलमधून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर ५% सवलत उपलब्ध होईल.🛏️ ६. हॉस्पिटलायझेशन खर्चावर १०% सवलतरुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या उपचारांच्या हॉस्पिटलायझेशन शुल्कावर १०% सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.टीप: इम्प्लांट व काही विशिष्ट वैद्यकीय साहित्यांवर ही सवलत लागू नसू शकते. लागू असलेल्या अटी हॉस्पिटलच्या नियमानुसार असतील.❤️ MoU अंतर्गत अतिरिक्त आरोग्यविषयक उपक्रमया कराराचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आरोग्यजागृती यांनाही प्रोत्साहन देणे हा आहे.👨⚕️ मोफत आरोग्यजागृती सत्रेसमूहातील सदस्यांच्या ठिकाणी विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्यजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येईल.🩺 प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिरेसदस्यांच्या ठिकाणी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.🚑 रुग्णवाहिका सुविधासमूहातील सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी, उपलब्धतेनुसार मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.📋 विशेष आरोग्य तपासणी पॅकेजेसहॉस्पिटलच्या नियमानुसार सदस्यांसाठी त्यांच्या गरजेनुसार विशेष आरोग्य तपासणी पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात येतील.🤝 या उपक्रमामागील आमचा उद्देशमनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपचा मूलभूत उद्देश केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे नसून, समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीचे नाते निर्माण करून गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे हा आहे.आरोग्य हा प्रत्येक कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गंभीर आजार, अचानक उद्भवणारी वैद्यकीय परिस्थिती किंवा महागडे उपचार यामुळे कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक ताण येऊ शकतो.अशा परिस्थितीत समूहातील सदस्यांना योग्य मार्गदर्शन, विश्वासार्ह वैद्यकीय सेवा आणि शक्य तितकी आर्थिक सवलत मिळावी, यासाठी हा MoU एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.“सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी” या विचारातून हा उपक्रम साकारला आहे.📌 सदस्यांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या अटीMoU अंतर्गत सुविधा घेताना काही आवश्यक बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.हॉस्पिटलमध्ये कोणतीही सेवा किंवा उपचार घेण्यासाठी सदस्याने मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपचे ओळखपत्र रिसेप्शनवर सादर करणे आवश्यक आहे.आश्रित व्यक्तीने उपचार घेत असल्यास संबंधित सदस्याचे ग्रुप ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत आवश्यकतेनुसार सादर करावी.MoU च्या लाभार्थी सदस्यांकडून रुग्णालयात दाखल होताना किंवा आपत्कालीन उपचार घेताना सुरक्षा ठेव (Security Deposit) आकारली जाणार नाही, करारातील लागू अटींनुसार.या MoU अंतर्गत मिळणाऱ्या सवलती KIMS मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या इतर योजना किंवा पॅकेजसोबत एकत्रित करता येणार नाहीत.हा सामंजस्य करार कराराच्या दिनांकापासून ३ वर्षांसाठी वैध राहील.रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत समूहाकडून आवश्यक संदर्भपत्र (Reference Letter) सादर करणे आवश्यक आहे.🌟 एक करार — अनेक शक्यताहा उपक्रम भविष्यात केवळ सवलतींपुरता मर्यादित न राहता समाजातील आरोग्यविषयक गरजा अधिक व्यापक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरेल.आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यजागृती कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रम आणि आवश्यकतेनुसार विविध आरोग्यसेवा उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.💙 आमची बांधिलकीमनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप हा मनमाडकरांना सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणारा आपुलकीचा मंच आहे.संस्कृती जपताना, समाजसेवा करताना आणि एकतेची भावना मजबूत करताना आरोग्यसेवेला देखील तितकेच महत्त्व देणे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.KIMS मानवता हॉस्पिटलसोबतचा हा सामंजस्य करार म्हणजे आपल्या समूहातील सदस्यांच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी उचललेले एक विश्वासार्ह आणि सकारात्मक पाऊल आहे.“संस्कृतीची जपणूक, सेवेतून माणुसकी आणि एकतेतून सशक्त समाज!”मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप, नाशिकसामाजिक बांधिलकी • सांस्कृतिक जपणूक • सेवाभाव • एकतादिनांक : ८ जुलै २०२६सामंजस्य करार : मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप, नाशिक × KIMS मानवता हॉस्पिटल, नाशिक
सध्या नाशिकस्थित असलेल्या मनमाड वासियांनो....
गेल्या काही महिन्यांपासून या ग्रुप मधून तुमची आमच्या मनमाडकरांबद्धलची सुरु असलेली तळमळ व संकल्प वाचून खरोखरीच अभिमान वाटला...खरे तर कुणीतरी आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला काही मदत पाहिजे का, हे विचारण्यासाठी धडपड करतंय, ही भावनाचं आनंद देणारी आहे....आमच्यासाठी आपण काही तरी चांगले करायला उत्सुक आहात...पण त्या आधी आमच्या नेमक्या गरजा, अपेक्षा काय आहेत, तेही लक्षात घ्या... काही खाजगी, काही कौटुंबिक,काही सार्वजनिक स्वरूपाच्या... काही कमरशिअल त्तर काही अगदीच व्यक्तिगत...तर काही हास्यास्पदही...त्यामुळेच ह्या अशा आगळ्या वेगळ्या प्रामाणिक ग्रुप बरोबर काही तरी शेअर करावंसं वाटतंय.... आम्हीही मनमाडला सार्वजनिक जीवनात 50 -60 वर्षापासून वावरतोय....मनमाड आता बदलतंय, पाणी, आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, सामाजिक, धार्मिक,व्यावसाईक, औद्योगिक, सांस्कृतिक....एक ना अनेक... येथील माणसांच्याही गरजा दिवसेंदिवस बदलताहेत...बघा हं... मनमाडकर काय काय विचारतात....अगदी साधे साधे प्रश्न...बारावी नंतर सायन्सला नाशिकला कुठल्या कॉलेजमध्ये माझ्या मुलीला टाकू...कोणता क्लास लावू...किती फी लागेल... त्यात आपल्याला काही कनसेशन मिळेल काय?... वगैरे माझ्या कुटुंबात हा सदस्य दुर्धर आजारी आहे, कोणते स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत...कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाऊ व साधारण खर्च काय येऊ शकतो...राहण्या- जेवणाची तात्पूरती काय व्यवस्था होऊ शकते...मला नुकताच job लागलाय, तूर्त महिना दोन महिने माझी कोठे जवळपास कमी खर्चात राहण्याची, जेवणाची सोय होऊ शकते?मला माझ्या धंद्यासाठी, व्यवसायासाठी हा, अमुक माल नाशिकहून घ्यायचाय, कोठे,चांगल्या प्रतीचा व किफायती दरात तो मिळू शकेल....माझ्याकडे फॉरेनहून जावई -भाचे येणार आहेत, त्यांना नाशिकला नेमके कोठे घेऊन जाऊ... व्हेज -नॉनव्हेज जेवण, थाळी सध्या कोठे चांगली किती रुपयात मिळू शकते...मला दोन तोळ्याचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या चांदीचे देव घ्यायचे आहेत, कोठे खात्रीशीर, किफायती दरात व शक्यतो फसवणूक होणार नाही अशी कोणती शो रूम आहे..मला नव्या पॅटर्न, डिझाईन, कलरची अद्यावत फॅशन ची साडी, ड्रेस, लग्नाची खरेदी कमी खर्चात कोठे चांगली चॉईसची मिळेल?..मला अद्यावत वॉशिंग मशीन, व एसी घ्यायचाय, कोठे चांगला व सवलतीत मिळेल...मला माझ्या गुरूंनी नारायण नागबळी विधि करायला सांगितलाय... त्र्यंबकेश्वरला कोणाकडे जावू , किती खर्च येईल... नाशिक -त्र्यंबकेश्वरला अमुक मंदिरात दर्शनाला जायचंय... किती वेळ लागेल नेमक केंव्हा जाऊ...मला चांगले दुकान व घरासाठी सुसज्ज रेडिमेड फर्निचर घ्यायचे आहे, कुठे, चांगले किफायती दरात मिळेल...मला इन्व्हेस्टमेंट करायचीय, शेअर मध्ये किंवा चांगल्या एरियात flat घ्यायचाय, टू बी एच के चा कुठे काय रेट चालू आहे, बिल्डर खात्रीचा आहे का?. मला गंगेत अस्थी विसर्जन करायच्यात.. व दशक्रिया तेरावा विधीही नाशकातच करायचंय,... कुठे जाऊ... फोन नं मिळेल का?...मला कालिदास मध्ये नाटक.. महेश काळे यांचा लाईव्ह शो पाहायला जायचंय.. कन्फर्म तिकीट मिळेल का..मला व कुटुंबियांना मल्टीफ्लेक्स मध्ये पिक्चरला जायचंय......कोणता चांगला पिक्चर, तिकीट किती, व ते कन्फर्म मिळेल का....माझ्या कुटुंबाचे नाशिकमधील मेडिकल उपचार पूर्ण झालेत, आता पेशंटला नाशिकहून मनमाडला एम्ब्युलन्स ने आणायचेय.. कुठे संपर्क साधु, किती पैसे लागतील...असे एक ना अनेक... काही अगदीच खाजगी, कौटुंबिक, काही सामाजिक,.. काही गरजेचे, काही अगदी जेन्यूईन प्रश्न आम्हाला येथे लोक विचारतात...योग्य माहिती नसल्याने अनेकदा आमची तोंडे साहजिकच बंद होतात....मित्रांनो हे जरी साधे, व्यक्तिगत,काही अगदीच कौटुंबिक, घरघुती प्रश्न असले तरी याची फक्त उत्तरेच आम्हाला हवी असतात , प्रत्यक्ष कोणी मदतीला आले नाही तरी चालेल पण मार्गदर्शन किमान फोन वर तरी मिळणं गरजेचं वाटत...आपले ग्रुपचे आता सहाशे मेम्बर होताहेत... अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी यात आहेत...हे परिचय वाचून पहिल्यांदाच आम्हालाही समजले.. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, परिचयाचा, माहितीचा फायदा या ग्रुपद्वारे मनमाडकराना यापुढे होणार ही खरे तर फार मोठी भाग्याची गोष्ट व मोठी उपलब्धी आहे.. वर उल्लेख केलेले सर्वच प्रश्न कोणालाही एकदम सोडवता येणार नाहीत, काही तर वाचून आपल्याला हास्यास्पदही वाटतील... हे कटु सत्य आहे ... मात्र यातील 15-20 टक्के प्रश्नांचे समाधान व मदत झाली तरी मनमाडकर आपले फार फार आभारी होतील..गौतम व सध्या असलेल्या नाशिकवासीय मनमाडकरांनी हा मदतयोग जुळवून आणला त्याबद्धल खरोखरीच आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन...व शुभेच्छा... आमचाही यासाठी काही खारीचा वाटा नाशिककरांसाठी देता आला तर तेही आम्ही आमचे भाग्यच समजू...धन्यवाद...नरेश गुजराथी, दैनिक जनश्रद्धा,
हेरिटेच वॅाक
मनमाड सोशल अँण्ड कल्चरल क्लबतर्फे महिन्यातून एकदा हेरिटेच वॅाक घ्यावे असे एक प्रपोजल आहे. त्यासाठी नाशिकच्या प्रा. अनिता जोशी यांनी संमती दिली आहे. त्या इंडॉलॉजी (Indology) अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि INHCRF (Indian Numismatic Historical & Cultural Research Foundation) सोबत काम करणाऱ्या प्रसिद्ध हस्तलिखित संवर्धक म्हणून त्या काम करतात. प्रा. जोशी नाशिक शहराचा १,००० वर्षे जुना वारसा आणि प्राचीन वास्तूंची माहिती देतात.नाशिकचे प्राचीन वाडे, मंदिरांचा इतिहास आणि ऐतिहासिक पोथ्या यावर त्यांचे सखोल संशोधन आहे. जुन्या वास्तूंच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यशाळांमध्ये त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होतात. त्यांच्याबरोबर आपण हेरिटेच वॅाक करु शकतो. जे या उपक्रमात सहभागी होऊ शकतात त्यांनी खालील नंबरवर आपली नावे द्यावी. महिन्यातीत एका रविवारी सकाळी ७ ते ९ अशी वेळ यासाठी द्यावी लागणार आहे. १०० हून अधिक नावे आली तर आपण हा उपक्रम सुरु करु. त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी होतील हा यामागील उद्देश आहे.धनंजय कमोदकरउपाध्यक्ष, एमएससी क्लबमो - 9921118182
Manmad Social & Culture Group - अस्थायी पदाधिकारी यांची निवड
नाशिकमध्ये राहणारे मनमाडकर यांनी क्लब मध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, ज्यांना वेळ देता येईल, काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांची क्लब कडे आलेली नावे व काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र करून अस्थायी पदाधिकारी यांची निवड केली आहे, अजून कोणाला समित्यांमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यांचाही समावेश करू, ही निवड एक काम करण्यासाठी व्यवस्थेचा भाग आहे, बाकी सर्वच पदाधिकारी आहे.Manmad Social & Culture Group (एम.एस.सी. क्लब) - नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)अध्यक्ष - गौतम कांतीलाल हिरणकार्याध्यक्ष - बापू वावरेउपाध्यक्ष - शंकरशेठ नागरेउपाध्यक्ष - धनंजय कमोदकरसेक्रेटरी - हेमंत एकनाथ सोनवणेखजिनदार - वैशाली जगदीश देवरे (पाटोदकर)प्रमुख मार्गदर्शकअजित संपतलाल सुराणाजयेश सुनील भंडारीनरेंद्र शाकव्दीपीआनंद श्रीनिवास अग्रवालगौतम मोहनलाल संचेतीपराग महेंद्र पाटोदकरयोगेश बागरेचामॅनेजिंग कमिटीअध्यक्ष - गौतम संचेतीकार्याध्यक्ष- जगदीश देवरे, अविनाश धारणकरउपाध्यक्ष - मधुकर राऊतउपाध्यक्ष - संतोष नाईकउपाध्यक्ष - चंद्रशेखर कुलकर्णीउपाध्यक्ष - अनिल जाधवसेक्रेटरी - महेंद्र कुलकर्णीसह सेक्रेटरी - नंदु कांगणेजनसंपर्क प्रमुखअनिल चांदवडकर, चंद्रकांत चौधरीकार्यकारी सदस्यसंतोष बोडखे -प्रकाश गवळी -मनोज बरडीयादेविदास कुणगर-शुभांगी भावे- इनामदार-अतुल भाबड डॉ. कुणाल निकाळे -अॅड. योगेश मस्के -गिरीश कांगणेबंटी शिंत्रेसुनील लोहकरेअनिल धुमाळदिनेश वाघदेवराम सदगीरकिशोर खोंडसंतोष पाखले -विनोद कुलकर्णी-संतोष उफाडे-उमाकांत ठाकूर -प्रशांत हिरण -शाम पेठकरवैद्यकीय समितीअध्यक्ष- डॅा. राजेंद्र शेजवळसदस्य -नितीन इंदलकर, पंकज खताळ, आरिफ शेख, सचिन शिलावट, महेश धनराज चव्हाण, राजेंद्र तोडकरशिक्षण समितीअध्यक्ष-विनोद कातकडे, डॅा. प्रा. वेदश्री थिगळे, डॅा. नहार , माधुरी देवरे - राऊत, रिना संचेती, अनिता घोलप, प्रा. सुरेंद्र पगारे, संध्या तोडकर,निवास समितीअध्यक्ष- योगेश नहारसदस्य - अजित ललवाणी वाणी, प्रकाश जैनडब्बा समितीअध्यक्ष- संतोष लोढा, अरविंद निकुंभ, देवकुमार बागुल, संतोष संकलेचारोजगार समितीअध्यक्ष - अविनाश शिरसाट, राजेश आहेर पाटील, पंकज वालेउद्याोग व व्यापार समितीअध्यक्ष - अतुल भाबडसदस्य - संजय शिंदे, संजय लोढा, दिलीप बोरामहिला समितीअध्यक्ष - सौ. रिना गौतम संचेतीसदस्य - संजोग कुलकर्णी, हेमा उपासणी, विनीता कुलकर्णी (खांदाट), पल्लवी कुशारे, सपना परब, जयश्री माणके, स्मिता कुलकर्णीयुवा समितीअध्यक्ष - अनिकेत वावरेखुशी पाटोदकरसिद्धार्थ बरडीयासृष्टी दिलीप जाधवमनाली देवरेसुधाकर सोनवणेश्रेयांस संचेतीसांस्कृतिक समिती प्रा. सौ. वेदश्री थिगळे, प्रज्ञा कुलकर्णी, दिलीप जाधव, संगीता महाशब्दे, रंजना कुलकर्णी, जयश्री मोरे, संगीता आबडक्रिडा समितीअध्यक्ष - श्रद्धा कुलकर्णी, शालीनी गरुड, कुंदा बोरसे, ढासेप्रोजेक्ट चेअरमन१) नववर्षाचे स्वागत - - माधुरी देवरे - राऊत२) कोजागिरी पौर्णिमा - साधना गांगुर्डे (पाटील) ३) वनभोजन - उत्तरा तिडके (राऊत)४) एक गेट टुगेदर - भारती पाटील (गांगुर्डे) -५) एखादी ट्रीप- शैलेजा ब्राम्हणकर (मालपुरे)६) गणेशोत्सव - भिकाजी कुलकर्णी७) नवरात्रोत्सव - संतोष बोडके, भारती गुजराथी
Manmad Social & Culture Group (एम.एस.सी. क्लब) च्या अध्यक्षपदी निवड
Manmad Social & Culture Group (एम.एस.सी. क्लब) च्या अध्यक्षपदी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व अशोका बिल्डकॅानचे डायरेक्टर गौतम कांतीलाल हिरण यांची निवड आपण केली आहे. हिरण यांनी १ लाखाची देणगी जाहीर केली.हिरण परिवार मनमाड येथे व्यवसायाबरोबर च सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर आहे.विशेष म्हणजे ते कल्पक आहे. धोंड्याचा सोहळा लक्षवेधी करणारे गौतम हिरणमुलीचा मान व जावयाला वाण अशा धोंड्याच्या महिन्याला आधुनिक झालर देत नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पध्दतीने मराठमोळया थाटात करत हा सोहळा राष्ट्रीय पातळीवर नेला. त्यासाठी त्यांनी थेट सहा बैलगाड्या गावातून मागवून त्याची सजावट करुन जावई व मुलींची त्यावरुन मिरवणूक काढली. लेझिम पथक, हलगी, टाळ - मृंदुगाचा गजरही झाला. त्यानंतर ही बातमी सर्वच न्यूज चॅनलने प्रसिध्द करत हा सोहळा राष्ट्रीय पातळीवर नेला.या हटके सोहळ्यात मुली व जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही देण्यात आला होता. जावई धोतर, कुर्ता व टोपी तर मुलीने नववारीचा शृंगार केला होता. यावेळी या दोघांचे स्वागतही वेगळ्या पध्दतीने केले गेले. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी व फुलांची सजवाट केली गेली. या सोहळ्यात भविष्य सांगणारा लक्षवेधी ठरला. तर मेंहदीचा सोहळाही येथे रंगला. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, १३ बहिणी व सर्व जावई आले.आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी यासाठी गौतम हिरणने थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ३३ महिन्यांनंतर अधिकचा महिना येत असतो. यावेळी मुलीचा मान व जावयाला वाण दिले जाते. त्यामुळे हा सोहळा हिरण परिवाराने वेगळ्या पध्दतीने साजरा करणार आहोत.गौतम हिरण हे अशोका बिल्डकॅानचे संचालक आहेत. ते सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमातही नेहमी सहभागी होऊन योगदान देतात.
वैद्यकीय समिती अध्यक्षपदी नियुक्ती
वैद्यकीय समिती अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शेजवळ यांची नियुक्तीया समितीत दहा सदस्य असणार असून ती रुग्णांना मदत करणारी आहे.- परिचयडॉ राजेंद्र शेजवळ पाटील (M D Homeopathy) श्रीकुल अपार्टमेंट, पंपिंग स्टेशन,गंगापूर रोड नाशिक. मो.9423178179 - सामाजिक कार्यसरचिटणीस, महाराष्ट्र शेतकरी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून मनमाड परिसरात तांत्रिक शिक्षण देण्यासाठी आय टी आय, पॉलिटेक्निकची स्थापना,- उपसभापती मनमाड नगर परिषद शिक्षण मंडळ. मा. सेक्रेटरी नाशिक जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी. मा.डी पी एम जिल्हा रुग्णालय नाशिक.नाशिक जिल्हा.