call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
Moments & Memories

photo_library
छायाचित्र दालन

आमच्या विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची झलक.

सह्याद्री हॉस्पिटलसोबत मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपचा सामंजस्य करार

सह्याद्री हॉस्पिटलसोबत मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपचा सामंजस्य करार

मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्यात सोमवारी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचा मसुदा वैद्यकीय क्षेत्रातील योगेश बागरेचा, नितीन इंदलकर, महेश चव्हाण तसेच इतर सदस्यांना दाखवून त्यांच्या सूचना घेण्यात आल्या.   पूर्ण बातमी वाचा…

आरोग्यसेवेत नवे पर्व — मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप व KIMS मानवता हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार

आरोग्यसेवेत नवे पर्व — मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप व KIMS मानवता हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार

मनमाडकरांना एकत्र आणत सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप, नाशिक यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.समाजातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार, आधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने KIMS मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्यासोबत दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.हा करार केवळ सवलतींचा करार नसून, आपल्या समूहातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पूर्ण बातमी वाचा...  

वनभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन - रामसृष्टी गार्डन

वनभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन - रामसृष्टी गार्डन

नमस्कार, मनमाड सोशल अण्ड कल्चरल क्लबची स्थापना झाल्यानंतर आपण कार्यकारिणी तसेच विविध समित्यांची स्थापना केली. त्यानंतर ट्रस्टच्या नोंदणी व इतर कामांना सुरुवात करण्यात आली. या काळात अनेक सदस्यांनी उदारपणे देणग्याही जाहीर केल्या. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचा परिचय झाला असला, तरी अनेकांची प्रत्यक्ष भेट होणे अद्याप बाकी आहे. याच उद्देशाने, आपण सर्वांनी एकत्र यावे, संवाद साधावा, एकमेकांचा परिचय करून घ्यावा आणि स्नेह अधिक दृढ व्हावा, ही भावना मनात ठेवून वर्षभराच्या नियोजित उपक्रमांतर्गत वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३१ मे २०२६ रोजी तपोवन येथील रमणीय ‘रामसृष्टी गार्डन’ येथे आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत निसर्गाच्या सानिध्यात आनंदी क्षण अनुभवण्याची ही एक सुंदर संधी असेल. मे महिन्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हिरवाईने नटलेले हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वानेही समृद्ध आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले ते स्थळ, प्रभू श्रीरामांची कुटी, सीता मातेचे अपहणर केलेले ठिकाण. तसेच गोदावरी व कपीला नदीचा संगम येथे पाहायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी उभारलेली ६३ फूट उंचीची भव्य श्रीराम मूर्ती हे येथील विशेष आकर्षण आहे. निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर संगम असलेल्या या ठिकाणाहून आपल्या स्नेहमेळाव्याची सुरुवात होत आहे. आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे व आपापले डबे सोबत आणावेत, ही नम्र विनंती.  स्थळ : रामसृष्टी गार्डन, तपोवन, नाशिक दिनांक : रविवार, ३१ मे २०२६ वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत