arrow_back
गॅलरीकडे परत
आरोग्यसेवेत नवे पर्व — मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप व KIMS मानवता हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार
मनमाडकरांना एकत्र आणत सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप, नाशिक यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
समाजातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार, आधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने KIMS मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्यासोबत दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
हा करार केवळ सवलतींचा करार नसून, आपल्या समूहातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.