call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
arrow_back गॅलरीकडे परत

एमएससी ग्रुपतर्फे उदय किसवे, अजित सुराणा यांचा सत्कार

एमएससी ग्रुपतर्फे उदय किसवे, अजित सुराणा यांचा सत्कार

मनमाडच्या शिरपेचात मानाचे तुरा रोवणाऱ्या दोन मान्यवरांच्या उल्लेखनीय यशाबद्दल मनमाड सोशल अॅण्ड कल्चरल ग्रुपच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. मनमाडचे सुपुत्र तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे यांची सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तसेच ग्रुपचे ट्रस्टी अजितभाऊ सुराणा यांची महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या मान्यवरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर मिळवलेले यश मनमाडकरांसाठी अभिमानास्पद आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यासाठी मनमाड सोशल कल्चरल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान केला.

 

या सत्कारप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष गौतम हिरण, ट्रस्टी योगेश बागरेचा, आनंद अग्रवाल, गौतम संचेती यांच्यासह वसंत गवळी, संतोष नाईक आणि संजय शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या यशामुळे मनमाडच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


दरम्यान, मनमाडचे आणखी एक सुपुत्र नंदकुमार ठाकूर यांची पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दलही मनमाड सोशल अॅण्ड कल्चरल ग्रुपच्या वतीने लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी शशिकांत सुराणा हे सुध्दा उपस्थित होते.