call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
arrow_back गॅलरीकडे परत

वनभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन

नमस्कार, 

मनमाड सोशल अण्ड कल्चरल क्लबची स्थापना झाल्यानंतर आपण कार्यकारिणी तसेच विविध समित्यांची स्थापना केली. त्यानंतर ट्रस्टच्या नोंदणी व इतर कामांना सुरुवात करण्यात आली. या काळात अनेक सदस्यांनी उदारपणे देणग्याही जाहीर केल्या. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचा परिचय झाला असला, तरी अनेकांची प्रत्यक्ष भेट होणे अद्याप बाकी आहे. याच उद्देशाने, आपण सर्वांनी एकत्र यावे, संवाद साधावा, एकमेकांचा परिचय करून घ्यावा आणि स्नेह अधिक दृढ व्हावा, ही भावना मनात ठेवून वर्षभराच्या नियोजित उपक्रमांतर्गत वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३१ मे २०२६ रोजी तपोवन येथील रमणीय ‘रामसृष्टी गार्डन’ येथे आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत निसर्गाच्या सानिध्यात आनंदी क्षण अनुभवण्याची ही एक सुंदर संधी असेल. मे महिन्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हिरवाईने नटलेले हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वानेही समृद्ध आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले ते स्थळ, प्रभू श्रीरामांची कुटी, सीता मातेचे अपहणर केलेले ठिकाण. तसेच गोदावरी व कपीला नदीचा संगम येथे पाहायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी उभारलेली ६३ फूट उंचीची भव्य श्रीराम मूर्ती हे येथील विशेष आकर्षण आहे. निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर संगम असलेल्या या ठिकाणाहून आपल्या स्नेहमेळाव्याची सुरुवात होत आहे. आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे व आपापले डबे सोबत आणावेत, ही नम्र विनंती. 

 

स्थळ : रामसृष्टी गार्डन, 

तपोवन, नाशिक 

दिनांक : रविवार, ३१ मे २०२६ 

वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत