call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
सध्या नाशिकस्थित असलेल्या मनमाड वासियांनो....
calendar_today 27 June 2026

सध्या नाशिकस्थित असलेल्या मनमाड वासियांनो....

गेल्या काही महिन्यांपासून या ग्रुप मधून तुमची आमच्या मनमाडकरांबद्धलची सुरु असलेली तळमळ व संकल्प वाचून खरोखरीच अभिमान वाटला...

खरे तर कुणीतरी आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला काही मदत पाहिजे का, हे विचारण्यासाठी धडपड करतंय, ही भावनाचं आनंद देणारी आहे....


आमच्यासाठी आपण काही तरी चांगले करायला उत्सुक आहात...

पण त्या आधी आमच्या नेमक्या गरजा, अपेक्षा काय आहेत, तेही लक्षात घ्या... काही खाजगी, काही कौटुंबिक,काही सार्वजनिक स्वरूपाच्या... काही कमरशिअल त्तर काही अगदीच व्यक्तिगत...तर काही हास्यास्पदही...

त्यामुळेच ह्या अशा आगळ्या वेगळ्या प्रामाणिक ग्रुप बरोबर काही तरी शेअर करावंसं वाटतंय....


 आम्हीही मनमाडला सार्वजनिक जीवनात 50 -60 वर्षापासून वावरतोय....

मनमाड आता बदलतंय, पाणी, आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, सामाजिक, धार्मिक,व्यावसाईक, औद्योगिक, सांस्कृतिक....एक ना अनेक... येथील माणसांच्याही गरजा दिवसेंदिवस बदलताहेत...


बघा हं... 

मनमाडकर काय काय विचारतात....अगदी साधे साधे प्रश्न...

बारावी नंतर सायन्सला नाशिकला कुठल्या कॉलेजमध्ये माझ्या मुलीला टाकू...कोणता क्लास लावू...

किती फी लागेल... त्यात आपल्याला काही कनसेशन मिळेल काय?... वगैरे 


माझ्या कुटुंबात हा सदस्य दुर्धर आजारी आहे, कोणते स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत...कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाऊ व साधारण खर्च काय येऊ शकतो...

राहण्या- जेवणाची तात्पूरती काय व्यवस्था होऊ शकते...


मला नुकताच job लागलाय, तूर्त महिना दोन महिने माझी कोठे जवळपास कमी खर्चात राहण्याची, जेवणाची सोय होऊ शकते?


मला माझ्या धंद्यासाठी, व्यवसायासाठी हा, अमुक माल नाशिकहून घ्यायचाय, कोठे,चांगल्या प्रतीचा व किफायती दरात तो मिळू शकेल....


माझ्याकडे फॉरेनहून जावई -भाचे येणार आहेत, त्यांना नाशिकला नेमके कोठे घेऊन जाऊ... 

व्हेज -नॉनव्हेज जेवण, थाळी सध्या कोठे चांगली किती रुपयात मिळू शकते...


मला दोन तोळ्याचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या चांदीचे देव घ्यायचे आहेत, कोठे खात्रीशीर, किफायती दरात व शक्यतो फसवणूक होणार नाही अशी कोणती शो रूम आहे..


मला नव्या पॅटर्न, डिझाईन, कलरची अद्यावत फॅशन ची साडी, ड्रेस, लग्नाची खरेदी कमी खर्चात कोठे चांगली चॉईसची मिळेल?..


मला अद्यावत वॉशिंग मशीन, व एसी घ्यायचाय, कोठे चांगला व सवलतीत मिळेल...


मला माझ्या गुरूंनी नारायण नागबळी विधि करायला सांगितलाय... त्र्यंबकेश्वरला कोणाकडे जावू , किती खर्च येईल... 

नाशिक -त्र्यंबकेश्वरला अमुक मंदिरात दर्शनाला जायचंय... किती वेळ लागेल नेमक केंव्हा जाऊ...


मला चांगले दुकान व घरासाठी सुसज्ज रेडिमेड फर्निचर घ्यायचे आहे, कुठे, चांगले किफायती दरात मिळेल...


मला इन्व्हेस्टमेंट करायचीय, शेअर मध्ये किंवा चांगल्या एरियात flat घ्यायचाय, टू बी एच के चा कुठे काय रेट चालू आहे, बिल्डर खात्रीचा आहे का?. 


मला गंगेत अस्थी विसर्जन करायच्यात.. व दशक्रिया तेरावा विधीही नाशकातच करायचंय,... कुठे जाऊ... फोन नं मिळेल का?...


मला कालिदास मध्ये नाटक.. महेश काळे यांचा लाईव्ह शो पाहायला जायचंय.. कन्फर्म तिकीट मिळेल का..

मला व कुटुंबियांना मल्टीफ्लेक्स मध्ये पिक्चरला जायचंय......कोणता चांगला पिक्चर, तिकीट किती, व ते कन्फर्म मिळेल का....


माझ्या कुटुंबाचे नाशिकमधील मेडिकल उपचार पूर्ण झालेत, आता पेशंटला नाशिकहून मनमाडला एम्ब्युलन्स ने आणायचेय.. कुठे संपर्क साधु, किती पैसे लागतील...


असे एक ना अनेक... काही अगदीच खाजगी, कौटुंबिक, काही सामाजिक,.. काही गरजेचे, काही अगदी जेन्यूईन प्रश्न आम्हाला येथे लोक विचारतात...

योग्य माहिती नसल्याने 

अनेकदा आमची तोंडे साहजिकच बंद होतात....


मित्रांनो हे जरी साधे, व्यक्तिगत,काही अगदीच कौटुंबिक, घरघुती प्रश्न असले तरी याची फक्त उत्तरेच आम्हाला हवी असतात , प्रत्यक्ष कोणी मदतीला आले नाही तरी चालेल पण मार्गदर्शन किमान फोन वर तरी मिळणं गरजेचं वाटत...


आपले ग्रुपचे आता सहाशे मेम्बर होताहेत... अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी यात आहेत...हे परिचय वाचून पहिल्यांदाच आम्हालाही समजले.. 

त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, परिचयाचा, माहितीचा फायदा या ग्रुपद्वारे मनमाडकराना यापुढे होणार ही खरे तर फार मोठी भाग्याची गोष्ट व मोठी उपलब्धी आहे.. 


वर उल्लेख केलेले सर्वच प्रश्न कोणालाही एकदम सोडवता येणार नाहीत, काही तर वाचून आपल्याला हास्यास्पदही वाटतील... हे कटु सत्य आहे ...


 मात्र यातील 15-20 टक्के प्रश्नांचे समाधान व मदत झाली तरी मनमाडकर आपले फार फार आभारी होतील..


गौतम व सध्या असलेल्या नाशिकवासीय मनमाडकरांनी हा मदतयोग जुळवून आणला त्याबद्धल खरोखरीच आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन...व शुभेच्छा... 

आमचाही यासाठी काही खारीचा वाटा नाशिककरांसाठी देता आला तर तेही आम्ही आमचे भाग्यच समजू...

धन्यवाद...


नरेश गुजराथी, दैनिक जनश्रद्धा,