call श्री. गौतम संचेती : 9422756651

Manmad Social & Culture Group

🚩 संस्कृती , ❤️ सेवा आणि 🤝 एकता

नाशिक मधील मनमाडकरांना जोडणारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचे व्यासपीठ

workspace_premium नोंदणीकृत संस्था (नोंदणी क्र. नाशिक/0000377/2026)
हेरिटेच वॅाक
calendar_today 27 June 2026

हेरिटेच वॅाक

मनमाड सोशल अँण्ड कल्चरल क्लबतर्फे महिन्यातून एकदा हेरिटेच वॅाक घ्यावे असे एक प्रपोजल आहे. त्यासाठी नाशिकच्या प्रा. अनिता जोशी यांनी संमती दिली आहे. त्या इंडॉलॉजी (Indology) अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि INHCRF (Indian Numismatic Historical & Cultural Research Foundation) सोबत काम करणाऱ्या प्रसिद्ध हस्तलिखित संवर्धक म्हणून त्या काम करतात. प्रा. जोशी नाशिक शहराचा १,००० वर्षे जुना वारसा आणि प्राचीन वास्तूंची माहिती देतात.


नाशिकचे प्राचीन वाडे, मंदिरांचा इतिहास आणि ऐतिहासिक पोथ्या यावर त्यांचे सखोल संशोधन आहे. जुन्या वास्तूंच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यशाळांमध्ये त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होतात. त्यांच्याबरोबर आपण हेरिटेच वॅाक करु शकतो. जे या उपक्रमात सहभागी होऊ शकतात त्यांनी खालील नंबरवर आपली नावे द्यावी. महिन्यातीत एका रविवारी सकाळी ७ ते ९ अशी वेळ यासाठी द्यावी लागणार आहे. १०० हून अधिक नावे आली तर आपण हा उपक्रम सुरु करु. त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी होतील हा यामागील उद्देश आहे.


धनंजय कमोदकर

उपाध्यक्ष, एमएससी क्लब

मो - 9921118182