✨ नवी सुरुवात, नवे पाऊल: 'मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुप'च्या बँक खात्याचा शुभारंभ!
गेल्या काही दिवसांपासून मनमाड सोशल अँड कल्चरल ग्रुपच्या ट्रस्टची नोंदणी, पॅन कार्ड, बँक खाते उघडणे आदी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे आपल्या काही नियोजित उपक्रमांना तात्पुरती स्थगिती द्यावी लागली. याच काळात ग्रुपच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) कामही सुरू करण्यात आले असून ते अद्याप प्रगतीपथावर आहे. आता बँक खाते सुरू झाल्यामुळे आपल्या संस्थेला देणगी देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. मर्चंट्स बँकेच्या कोणत्याही शाखेत आपण थेट देणगी जमा करू शकता. तसेच, संस्थेच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीनेही रक्कम हस्तांतरित करता येईल.
सर्व सदस्य व हितचिंतकांना विनंती आहे की, ज्यांनी देणगी जाहीर केली आहे किंवा ज्यांना देणगी द्यायची आहे, त्यांनी ती संस्थेच्या बँक खात्यावर जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर कृपया त्याची माहिती आम्हाला कळवावी, जेणेकरून संबंधित देणगीची अधिकृत पावती तयार करून देण्यात येईल. आतापर्यंत काही सदस्यांनी धनादेश (चेक) तर काहींनी रोख स्वरूपात देणगी दिली आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.