Manmad Social & Culture Group (एम.एस.सी. क्लब) च्या अध्यक्षपदी निवड
Manmad Social & Culture Group (एम.एस.सी. क्लब) च्या अध्यक्षपदी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व अशोका बिल्डकॅानचे डायरेक्टर गौतम कांतीलाल हिरण यांची निवड आपण केली आहे. हिरण यांनी १ लाखाची देणगी जाहीर केली.
हिरण परिवार मनमाड येथे व्यवसायाबरोबर च सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर आहे.
विशेष म्हणजे ते कल्पक आहे.
धोंड्याचा सोहळा लक्षवेधी करणारे गौतम हिरण
मुलीचा मान व जावयाला वाण अशा धोंड्याच्या महिन्याला आधुनिक झालर देत नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पध्दतीने मराठमोळया थाटात करत हा सोहळा राष्ट्रीय पातळीवर नेला. त्यासाठी त्यांनी थेट सहा बैलगाड्या गावातून मागवून त्याची सजावट करुन जावई व मुलींची त्यावरुन मिरवणूक काढली. लेझिम पथक, हलगी, टाळ - मृंदुगाचा गजरही झाला. त्यानंतर ही बातमी सर्वच न्यूज चॅनलने प्रसिध्द करत हा सोहळा राष्ट्रीय पातळीवर नेला.
या हटके सोहळ्यात मुली व जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही देण्यात आला होता. जावई धोतर, कुर्ता व टोपी तर मुलीने नववारीचा शृंगार केला होता. यावेळी या दोघांचे स्वागतही वेगळ्या पध्दतीने केले गेले. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी व फुलांची सजवाट केली गेली. या सोहळ्यात भविष्य सांगणारा लक्षवेधी ठरला. तर मेंहदीचा सोहळाही येथे रंगला. या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, १३ बहिणी व सर्व जावई आले.
आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी यासाठी गौतम हिरणने थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ३३ महिन्यांनंतर अधिकचा महिना येत असतो. यावेळी मुलीचा मान व जावयाला वाण दिले जाते. त्यामुळे हा सोहळा हिरण परिवाराने वेगळ्या पध्दतीने साजरा करणार आहोत.
गौतम हिरण हे अशोका बिल्डकॅानचे संचालक आहेत. ते सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमातही नेहमी सहभागी होऊन योगदान देतात.